January 18, 2025
Uncategorized

गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवणे आहेत गरजेच्या…

 By Editorial team /  3 June  2022 ,5 Mins Read

What to Know Before
Investing

एक सुंदर प्रकारचे जीवन जगण्याची इच्छा ही सर्वाचीच असते, परंतु त्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे पैशांची गुंतवणूक ही योग्यरित्या करणे. पैशाचे काम आपल्याला कधी पडेल हे काहीच सांगता येत नाही. जसे की, आपल्याला कुठे फिरायला जायचे असेल, घरात लग्न समारंभ असेल, नाहीतर कदाचित अचानकपणे दवाखान्याचे काम पडले तर या सर्व गोष्टींसाठी पैशांची गरज ही पडतेच. अश्या वेळेला एकदम पैशांची जुळवाजुळव करायला खूप कठीण जाते.

अश्यावेळी फक्त आपण गुतंवणूक केलेला पैसाच कमी येतो. आपण गुतंवणूक केला असलेल्या पैश्यांचाच आपापल्या पुरेपूर फायदा होतो. परंतु तो पैसा आपल्याला योग्यवेळी मिळेलच असे नाही, म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकी बद्दल काही टिप्स देणार आहोत. जेणे करून तुम्ही या योग्य गोष्टींचा अवलंब करून तुमच्या केलेल्या गुंतवणूकीचा पुरेपूर फायदा घेऊ शकाल.

गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवणे आहेत गरजेच्या… – What to Know
Before Investing

What to Know Before InvestingWhat to Know Before
Investing

  • गुंतवणूक करण्यापूर्वी आपले नेटवर्थ (निव्वळ रक्कम) माहित असणे आवश्यक आहे –

ज्यावेळी आपण गुतंवणूक करण्याचे ठरवतो त्यावेळेला आपणास गुतंवणूक करण्यासाठी एक योजना आखणे आवश्यक असते. आपण केलेल्या गुंतवणूकीचा फायदा आपल्याला त्याच क्षणी कळतो, जेव्हा आपण केल्या असलेल्या निव्वळ रक्कमेच्या गुंतवणूकीचे लक्ष्य काय असेल हे आपणास माहिती असेल.

नेटवर्थ (निव्वळ रक्कम) शोधणे हेच आपले यशस्वी आर्थिक योजनेच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल आहे. गुंतवणूकीचे ध्येय जाणून घेण्यासाठी, प्रथम आपण आपल्या मालमत्तेची आणि उत्तरदायित्व यांची यादी करा. ही यादी आपल्याला सांगेल की आपण किती गुंतवणूक करू शकता आणि आपण किती जोखीम पत्कारू शकता.

  • आपणास समजणाऱ्या उत्पादनांमध्ये गुंतवणूक कधीच करु नका –

बऱ्याचदा असे होते की, आपण आपल्या मित्रांच्या सल्ल्याने अश्या ठिकाणी किंवा एखाद्या उत्पादनात गुंतवणूक करून टाकतो, ज्या बद्दलची माहिती आपल्याला काहीच नसते. यामुळे आपल्याला आपण केल्या असलेल्या गुंतवणूकीतून होणाऱ्या  नफा आणि नुकसानी बदल काही समजत नाही.

अश्या प्रकारे केली गेलेली गुंतवणूक आपल्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते, आपण गुंतवणूक केला असलेला पैसा सुद्धा गमावून बसू शकतो. म्हणून अश्या जागी पैश्याची गुंतवणूक कधीच करू नये ज्या बद्दल आपल्याला काहीच महित नसते. ज्यास्त प्रमाणात लाभ मिळेल या आशेने आपले खूप मोठया प्रमाणात नुकसान होऊ शकते.

  • गुंतवणूक ही नियमितपणे आणि योग्यरित्या करणे –

जर आपण चागल्या प्रकारची गुंतवणूक करून त्यापासून आपल्याला एक चांगल्या प्रकारचे उत्पन्न हवे असेल तर एका निश्चित कालावधीसाठी गुंतवणूक करा आणि ही नियमित ठेवा. उदाहरणार्थ, प्रत्येक महिन्यात आपल्या मिळत असलेल्या पगारामधून निश्चित रक्कम गुंतवा, ती रक्कम जर कमी असेल तर आपल्याला त्याचे दीर्घ कालावधीनंतर चांगले परिणाम बघयला मिळतील. तसेच, आपण बाजारात होणाऱ्या चढउतारातून आपली गुंतवणूक स्थिर ठेवू शकतो.

  • गुंतवणूक ही दिर्घ काळापर्यंत करायला पाहिजे –

आपण केली असलेली निव्वळ रक्कमेची गुंतवणूक जर कमी काळापर्यंत मर्यादित असेल तर ती आपल्याला जास्त लाभ करून देऊ शकत नाही, तसेच या गुंतवणूकीचा उपयोग आपण मोठ्या कामात पण करू शकत नाही.

जर आपल्याला मोठया प्रमाणात लाभ हा पाहीजे असेल तर, आपल्याला दीर्घकाळासाठी गुंतवणूक ही करावी लागेल. कमीतकमीतेवर्षासाठी तरी आपल्याला गुंतवणूक करण्याची  आवश्यकता आहे. अश्या प्रकारच्या गुंतवणुकीतून आपल्याला चागल्या प्रकारचा लाभ हा मिळतो.

चक्रवाढ व्याज लागू केल्यास आपणास आपल्या मूळ रक्कमेवर व्याज मिळते ज्यामुळे आपल्याला मिळणाऱ्या लाभाचा दर वाढतो.

  • गुंतवणूक ही एकाच प्रकारची कधीच करू नये, पोर्टफोलिओमध्ये विविधता आणावी आणि वेगवेगळया प्रकारच्या उद्योगात गुंतवणूक करा –

जर आपण एकाच प्रकारची गुंतवणूक करीत असाल तर त्यातून मिळणाऱ्या  लाभाचे प्रमाण कमी आणि धोक्याचे प्रमाण जास्त असते. याकरिता वेगवेगळया प्रकारात गुंतवणूक ही केली गेली पाहिजे.

आपण गुंतवणूक केल्या असलेल्या पोर्टफोलियो मध्ये जर आपण वेगवेगळे बदल केले तर आपल्याला जास्त प्रमाणात  लाभ होतो. त्याच बरोबर आपल्याला एकाच प्रकारच्या लाभावर अवलंबून राहावे लागत नाही.

आपल्या गुंतवणूकीची जोखीम कमी करण्यासाठी आपण भौगोलिक क्षेत्र, आर्थिक वर्ग आणि उद्योगांमध्ये आर्थिक जमाशिवाय गुंतवणूक करू शकतो.

  • केलेल्या गुंतवणूकीकडे दुर्लक्ष करू नये –

खूप लोक अशी असतात की, जे गुंतवणूक केल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करतात. लोकांची गुंतवणूकी बदलची अशी भावना असते की, एखाद्या उत्पादनात पैसा गुंतवणे म्हणजेच गुंतवणूक करणे होय.

खर बघितल तर गुंतवणूकीच्या वास्तविक प्रक्रियेला येथूनच सुरूवात होते. वर्षातून कमीतकमी एक किंवा दोन वेळा तरी आपण केल्या असलेल्या गुंतवणुकीची माहिती करून घ्यावी.

आपण हे माहिती करून घेतल पाहिजे की, आपल्याला मिळत असलेला लाभाचे प्रमाण किती आहे. जेणेकरून आपण योग्यवेळी गुंतवणूकी बदल योग्य तो निर्णय घेऊ शकू.

  • विमा हा गुंतवणुकीपासून वेगळाच ठेवा –

गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्याला गुंतवणूक आणि पॉलिसी बदल नीट समजावून घ्यावे लागेल की, ह्या दोन भिन्न भिन्न गोष्टी आहेत त्यांना कधीच एकत्रित करू नये. जीवनविम्याला कधीपण गुंतवणूक करण्याच्या हेतूने विकत घेऊ नये.

जीवनविमा हा विमा धारक असणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यु नंतर त्या व्यक्तींवर अवलंबून असणाऱ्या लोकांना सुरक्षित जीवन जगता यावे या करिता देण्यात येतो. लाभ मिळण्याच्या हेतूने आपण जर विम्या मध्ये गुंतवणूक करत असाल तर ते धोकादायक आहे.

अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या स्टॉकमार्केट मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात घ्याव्या लागतात – What to Know
before Investing in Stocks

  • मिळणारे रिटर्न आणि त्याचा दर यांची माहित अवश्य करून घ्या –

स्वस्त शेअर्स मिळवण्याचा अर्थ असा होत नाही की ते चांगले मूल्य घेऊन विकले जाऊ शकतात. एका शेअर्स ची मूळ किंमत माहित करून घेण्यासाठी काही  मूल्यवान मापदंडांच्या आधारांवर त्या शेअर्स ची तुलना केली जाते.

एका शेअर्स ची अस्तित्वात असलेली किंमत त्या शेअर्स ची वास्तविक किंमत कधीच दर्शवत नाही. पी म्हणजेच पार्टीसिपेंटरी नोटस मार्फत स्वस्त असणाऱ्या शेअर्स ची ओळख करून दिली जाऊ शकते. कारण आपण स्वस्त समजत असलेल्या शेअर्स ची मूळ किंमत ही आवश्यक नाही की स्वस्तच असली पाहिजे.

  • मिळणाऱ्या रिटर्न(परत) च्या मूळ किंमतींवर वर लक्ष केंद्रित करा:-

गुंतवणूकीदरम्यान, महागाईचा दर, कर आणि फी हे तीन घटक गुंतवणूकीच्या वास्तविक उत्पन्नाच्या दरावर परिणाम करतात. आपण त्याच आर्थिक उत्पादनांनमध्ये गुंतवणूक करवी जी आपल्याला करावर सुद्धा चांगल्या प्रकारे लाभ मिळून देणारी आहेत.

तसेच व्याजावर उत्पन्न मिळवण्याऐवजी भांडवलावर जास्त उत्पन्न आणि परतावा देऊ शकेल अशा उत्पादनांमध्ये गुंतवणूक करा.

  • बाजारामध्ये वाढणाऱ्या रकमेच्या चढ उताराकडे लक्ष देऊ नका –

शेअर्स बाजार हा स्थिर कधीच नसतो, यामुळे जर आपण एखाद्या उत्पादनामध्ये गुंतवणूक करीत असाल आणि आपण अशी आश्या करत असत की आपल्याला या गुंतवणूकीतून लाभच होणार आहे तर असे कधीच होत नाही. आपण बाजाराच्या तुलनेने एखाद्या शेअर्सचे सर्वेक्षण केले असेल आणि त्यानुसारच आपल्याला त्याचा लाभ हा होत असेल अस आपल्याला वाटते परंतु अश्याप्रकारे कधीच होत नाही.

आपण करीत असलेल्या विचारांच्या विपरीत शेअर्स बाजारात चढ उतार हा होतच राहतो. बाजारात होणारे चढ उतार हे कधीच कायम स्वरूपी नसतात, यामुळे घाबरण्या सारखे असे काही नाही. गुंतवणूक करतांना बाजारात जास्त प्रमाणात गुंतवणूक करू नये, तसेच ज्यास्त धोकादायक असणाऱ्या उत्पादनात गुंतवणूक कधीच करू नये.

गुंतवणूक केल्यानंतर, आपण त्या गुंतवणुकीच्या संबंधात जुळल्या असलेल्या नविन बाजार धोरणांविषयी वेळोवेळी आवश्य वाचत राहावे. असे केल्याने आपण केल्या असलेल्या गुंतवणूकीपासून होणाऱ्या धोक्याचे प्रमाण कमी होईल.

याच बरोबर आपल्याला एक चांगल्या प्रकारचे रिटर्न (उत्पन्न) देखील मिळेल. जास्त लाभ होणार अश्या लोभाने जर आपण गुंतवणूक कधीच करू नये. शेअर्स बाजाराच्या असलेल्या सर्व परिस्तिथीचा आपण पूर्णपणे बारकाईने अभ्यास करून, ती समजावून घेतल्यानंतरच आपण गुंतवणूक करायला पाहिजे.

गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूक तज्ञाचा सल्ला आवश्य घ्यावा, असे केल्याने आपल्या मनात येत असलेले गुंतवणूकी बदलचे विचार नाहीसे होऊन जातील.

 

Related posts

| ब्रेकिंग! शेतकऱ्यांना एका क्लिकवर मिळणार पीक विम्याची रक्कम, केंद्राने सुरू केली ‘ही’ नवी सुविधा Crop Insurance Digiclaim

Admin

१५० कोटी कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प योजना निधी मंजूर (रफ्तारअंतर्गत)

Admin

शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक, असे काढा शेतकरी प्रमाणपत्र

Admin

Leave a Comment