कुठे मिळेल शेतकरी प्रमाणपत्र ?
१. शेतकरी प्रमाणपत्र हे तुम्हाला तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्र तसेच महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील मिळवता येते.
२. तुम्ही जर कृषी विषयाशी निगडित पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असाल आणि तुमच्याकडे शेतकरी प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला याचा मोठा फायदा होईल.
३. तुम्ही जर शेतकरी आहात आणि तुम्हाला जमीन खरेदी करायची असेल तर तुम्हाला शेतकरी प्रमाणपत्र सादर करावे लागते.
आवश्यक कागदपत्रे
१. आधार कार्ड ( Adhar Card)
२. पासपोर्ट साईझ फोटो ( Passport size photo)
३. मतदान कार्ड ( Voting Card)
४. रेशन कार्ड
५. पाणी बिल
६. ड्राइविंग लायसन्स
७. वीज बिल
८. सातबारा किंवा ८ अ उतारा
९. स्वंयघोषणापत्र
अर्ज कसा करावा ?
१. आपले सरकारच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन नवीन वापरकर्ता नोंदणी या बटनावर क्लिक करून आपले नाव, मोबाइल क्रमांक , ई-मेल आयडी आदी माहिती भरून लॉगिन करावे.
२. त्यांनतर तुम्हाला समोर विविध विभागाचे नाव दिसतील त्यांपैकी महसूल विभाग निवडून महसूल सेवा बटनावर क्लिक करा.
३. पुढे तुम्हाला शेतकरी प्रमाणपत्र नावाचा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.
४. एक अर्ज उघडेल त्यामध्ये विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रे वेबसाइट वर अपलोड करावेत.
५. याबरोबर तुमचा फोटो तसेच सही देखील अपलोड करावी लागते.
अधिकृत संकेतस्थळ