January 17, 2025
Uncategorized

ग्रामपंचायतीचा पैसा कुठे खर्च होतो, कोण खर्च करतो मोबाईल मध्ये चेक करा | Gram Panchayat Information in Marathi Check in Mobile

 Gram Panchayat Information in Marathi – ग्रामपंचायत मध्ये येणारा पैसा, कुठे खर्च केला जातो, कोण खर्च करतो. अशी सर्व माहिती तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल मधून चेक करू शकता. ग्रामपंचायतला मिळणारे अनुदान व पैसा खर्च केला जातो का? खर्च केला जात असेल तर मग कोणत्या कामासाठी. तसेच ग्रामपंचायत मध्ये किती पैसा शिल्लक आहे. अशी सर्व माहिती तुम्ही मोबाईल मधूनच चेक करू शकता. याच्यासाठी खाली दिलेला सविस्तर मजकूर वाचा.

अनुक्रमानिका  पहा 

ग्रामपंचायत येणारा पैसा कुठे खर्च केला जातो पहा मोबाईल मध्ये | Gram Panchayat Information in Marathi

प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायत मध्ये वेगवेगळ्या माध्यमातून पैसा हा गोळा होत असतो. परंतु या पैशांचा हिशोब साधारण व्यक्तींना दिला जात नसतो. परंतु ग्रामपंचायत जो पैसा खर्च करते गावाच्या विकासासाठी. कोणत्याही कामासाठी या पैशांचा हिशोब ऑनलाईन पद्धतीने नोंदविला जात असतो. तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीचा पैसा कुठे खर्चा केला जात आहे. योग्य कामासाठी खर्च केला जात आहे का. जर खर्च केला जात आहे तर कोण खर्च करत आहे. अशी संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने मोबाईल मधून चेक करू शकता. याच्यासाठी खाली दिलेली माहिती वाचा.


ग्रामपंचायतचा हिशोब मोबाईल मधून चेक करा

तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीच्या पैशांचा हिशोब मोबाईल मधून चेक करू शकता. याच्यासाठी खाली वेबसाईट देण्यात आले आहे त्याच्यावर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये खर्च होणारा पैशांचा हिशोब. सविस्तर पणे पाहायला मिळू शकतो. तर चला पाहूया.

Gram Panchayat Hishob – तुमच्या गावातील ग्रामपंचायतीचा हिशोब. तुम्ही खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करून मोबाईल मधून चेक करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीचा पैसा कुठे खर्च केला जातो. कोणत्या कामासाठी खर्च केला जातो. ग्रामपंचायतचा पैसा कोण खर्च करते अशी संपूर्ण माहिती मिळून जाईल.

🌐 E Gramswaraj Portal Link – येथे क्लिक करा


ग्रामपंचायत चा हिशोब मोबाईल मधील चेक करा

1) सर्वात आधी वरती दिलेल्या E Gramswaraj Portal Link वरती क्लिक करा.

2) तुमच्यासमोर ई ग्राम स्वराज पोर्टल उघडेल. येथे तुम्हाला खूप सारे पर्याय दिसतील.3) आता Accounting Entity Wise Report या पर्यायावर क्लिक करा.

4) त्यानंतर Cash Book Report नावाचा पर्याय दिसेल याच्यावर क्लिक करा.

5) Cash Book Report मध्ये तुमची आवश्यक असलेली माहिती भरा.

जसे की, Month Wise > Month-Wise > Financial Year > State > Accounting Entity > Distinct Name > Block > Village > Month > Captcha Code > Get Report

अशा पद्धतीने तुम्हाला माहिती भरायची आहे.

6) Get Report बटनावर क्लिक केल्यानंतर. तुमच्या मोबाईल मध्ये एक PDF उघडेल.

7) येथे तुमच्या गावातील ग्रामपंचायतची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल.

8) येथे खर्च होणारा पैसा, त्याचबरोबर पैसा कोण खर्च करत आहे. कोणत्या कामासाठी खर्च केला गेला अशी संपूर्ण माहिती मिळेल

Related posts

दिलासादायक! शेतकऱ्यांना होणार 5 लाख सौर पंपांचं वाटप; नेमक्या तरतूदी काय? | PM Kusum Yojana

Admin

कुक्कुटपालन व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती

Admin

UPSC HallTicket – UPSC Admit Card

Admin

Leave a Comment