January 18, 2025
Uncategorized

शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक, असे काढा शेतकरी प्रमाणपत्र

 

भारतामध्ये अनेकांचा व्यवसाय हा शेतीवर (Agriculture) अवलंबून आहे. भारत ( India) हा कृषिप्रधान देश असून कोरोना काळात महाराष्ट्राच्या ( Maharashtra) अर्थव्यवस्थेला शेती व्यवसायाने मोठा हातभार लावला असून शेतकऱ्यांचा अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यात मोलाचा सहभाग आहे. तुम्ही जर शेती ( Farming) करत असाल तर तुम्ही शेतकरी (Farmer) असल्याचा प्रमाणपत्र ( Certificate) तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. नेमका कुठे भेटतो हा शेतकरी प्रमाणपत्र ( Farmers Certificate) याची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.तसेच खाली आपले सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाची लिंक देखील दिली आहे

कुठे मिळेल शेतकरी प्रमाणपत्र ?
१. शेतकरी प्रमाणपत्र हे तुम्हाला तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्र तसेच महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील मिळवता येते.
२. तुम्ही जर कृषी विषयाशी निगडित पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असाल आणि तुमच्याकडे शेतकरी प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला याचा मोठा फायदा होईल.
३. तुम्ही जर शेतकरी आहात आणि तुम्हाला जमीन खरेदी करायची असेल तर तुम्हाला शेतकरी प्रमाणपत्र सादर करावे लागते.

आवश्यक कागदपत्रे
१. आधार कार्ड ( Adhar Card)
२. पासपोर्ट साईझ फोटो ( Passport size photo)
३. मतदान कार्ड ( Voting Card)
४. रेशन कार्ड
५. पाणी बिल
६. ड्राइविंग लायसन्स
७. वीज बिल
८. सातबारा किंवा ८ अ उतारा
९. स्वंयघोषणापत्र

अर्ज कसा करावा ?
१. आपले सरकारच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन नवीन वापरकर्ता नोंदणी या बटनावर क्लिक करून आपले नाव, मोबाइल क्रमांक , ई-मेल आयडी आदी माहिती भरून लॉगिन करावे.
२. त्यांनतर तुम्हाला समोर विविध विभागाचे नाव दिसतील त्यांपैकी महसूल विभाग निवडून महसूल सेवा बटनावर क्लिक करा.
३. पुढे तुम्हाला शेतकरी प्रमाणपत्र नावाचा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.
४. एक अर्ज उघडेल त्यामध्ये विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रे वेबसाइट वर अपलोड करावेत.
५. याबरोबर तुमचा फोटो तसेच सही देखील अपलोड करावी लागते.

अधिकृत संकेतस्थळ

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

Related posts

(SSC Selection Posts) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 5369 जागांसाठी मेगा भरती

Admin

कुक्कुटपालन व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती

Admin

भारत सरकार मुद्रणालय नाशिक 17 जागा.

Admin

Leave a Comment