January 18, 2025
Uncategorized

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘या’ तारखेपर्यंत पॅन कार्ड आधार कार्डला करा लिंक, अन्यथा होईल मोठं नुकसान

 

आता नागरिकांनी पॅन कार्ड आधार कार्डला लिंक (Pan Card Aadhar Link) करणे बंधनकारक आहे. यासाठी डेडलाईन जारी करण्यात आली आहे.

पॅन कार्ड हे प्रत्येक व्यावसायिक भारतीय नागरिकाचे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. पैसे-पैशाच्या व्यवहारांपासून ते आयटीआर फाइलिंगपर्यंत याचा वापर केला जातो. तसेच तुम्हाला कोणता विमा (Insurance) अशा कामांसाठी देखील हे दोन्ही कार्ड लागतात. सरकारने आता प्रत्येकासाठी पॅन कार्ड आधारशी लिंक (Pan Aadhar Link) करणे बंधनकारक केले आहे. यासाठी सरकारने लोकांना 31 मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. या तारखेपूर्वी देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचे पॅन कार्ड आधारशी लिंक (Pan Aadhaar Link) करावे लागेल. असे करण्यात अयशस्वी होणे तुम्हाला महागात पडू शकते.

  • यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइटला https://www.incometax.gov.in/iec/foportal/ भेट द्यावी लागेल.
  • यानंतर आधार लिंकचा पर्याय निवडा. ही प्रक्रिया केल्यानंतर, तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक आणि आधार कार्डचे 12 अंक प्रविष्ट करावे लागतील.
  • त्यानंतर Validate चा पर्याय निवडा.
  • यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
  • ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट हा पर्याय निवडावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला पेनल्टी फी भरावी लागेल.
  • हे केल्यानंतर तुमचा पॅन आधार कार्डशी लिंक होईल.

1000 रुपये दंड आकारला जाईल
भारत सरकारने जारी केलेल्या निर्देशांनुसार, 31 मार्चपूर्वी देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचे पॅन कार्ड आधारशी लिंक(linking pan with aadhar) करावे लागेल. देय तारखेपूर्वी तुम्ही आधारशी पॅन लिंक केले नाही तर तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. जर तुम्ही आजपर्यंत हे काम केले नसेल तर ते त्वरित करा. तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक झाले आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

तुमचा पॅन आधारशी लिंक आहे की नाही कसे जाणून घ्याल ?

  • पॅन कार्डच्या आधार लिंकबद्दल (linking pan with aadhar) जाणून घेण्यासाठी, तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटला द्यावी लागेल.
  • यानंतर, येथे डाव्या बाजूला दिसणार्‍या ‘Link Aadhaar Status’ वर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्या डिस्प्लेवर एक नवीन विंडो उघडेल. येथे तुम्हाला View Link Aadhaar Status वर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक मेसेज येईल.
  • यावरून तुमचे पॅन कार्ड आधारशी (aadhar card) लिंक झाले आहे की नाही याची माहिती मिळेल.

एसएमएसद्वारे कसे कळणार?
आधारसह पॅन कार्डची (Pan Card) लिंक स्थिती जाणून घेण्यासाठी UIDPAN जर तुमचे पॅन कार्ड(Pan card) आधारशी (Aadhar card)लिंक केले असेल तर तुम्हाला ‘आधार आयटीडी डेटाबेसमधील पॅन (नंबर) शी संबंधित आहे’ असा संदेश मिळेल. अन्यथा तुमचे पॅन कार्ड (Pan card)आधारशी लिंक होणार नाही.

Related posts

गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवणे आहेत गरजेच्या…

Admin

जमीनीचा NA करा फक्त 100 रुपयात सर्वात मोठी बातमी.

Admin

दिलासादायक! शेतकऱ्यांना होणार 5 लाख सौर पंपांचं वाटप; नेमक्या तरतूदी काय? | PM Kusum Yojana

Admin

Leave a Comment