November 19, 2024
Uncategorized

आता वाळू-माफियांचा खेळ खल्लास! सरकारच थेट वाळूची करणार ऑनलाईन विक्री, ग्राहकांना मिळणार घरपोच सेवा .

 निसर्ग पासून आपला बचाव करण्यासाठी लोकांना घराची गरज असते. परंतु ही गरज आता गरज म्हणून पाहिली जात नाही. कारण आता प्रत्येकालाच लक्झरी आयुष्य जगण्याची सवय लागली आहे. त्यामुळे आपलं घर मोठं असावं असं प्रत्येकालाच वाटतं. परंतु या घरासाठी सर्वात महत्त्वाची लागणारी गोष्ट म्हणजे वाळू. घर दणकट व्हावे म्हणून वाळू उपयुक्त ठरते. वाळूचे (Sand Online) दरही गगनाला भिडले आहेत. सामान्य लोक घर बांधण्याठी वाळू माफियांकडून वाळूची खरेदी करतात. त्याचवेळी चढ्या भावाने वाळूची खरेदी (Sand Online) करावी लागते. परंतु आता वाळू माफियांकडून वाळूची खरेदी करावी लागणार नाही. आता थेट सरकारच घरपोच वाळूची सेवा देणार आहे.

सरकार ऑनलाईन करणार वाळूची विक्री
आता वाळू माफीयांची ठेकेदारी सरकार बंद करणार आहे. कारण वाळू विक्रीसाठी स्वतः सरकार पुढे येणार आहे. आता ग्राहकांना जास्त दराने वाळू माफियांकडून वाळू खरेदी करावी लागणार नाही. आता थेट सरकार ऑनलाइन पद्धतीने ग्राहकांना ग्राहक वाळूची विक्री करणार आहे.

मिळणार घरपोच सेवा
सरकार आता वाळूची विक्री ऑनलाइन करणार असल्यामुळे ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे. कारण आता ग्राहकांना थेट घरपोच सेवा मिळणार आहे. वाळू खरेदी करून ती घरी कशी आणायची यासाठी ग्राहकांना खटाटोप करायला लागणार नाही. तसेच वाळू खरेदी आणि घरपोच करण्यासाठी लागणारा अधिकचा खर्चही आटोक्यात येणार आहे.

सरकार वाळूचे डेपो लावून ऑनलाइन विक्री करणार आहे. तसेच घरपोच सेवेचे धोरण देखील स्वीकारणार आहे. याबाबत माहिती महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली आहे.

तर पुढच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘निळवंडे’ धरणातून पाणी सोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. ची माहिती देखील महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली आहे.

Related posts

MSRTC Free Travelling Scheme : हे कार्ड असेल तर सर्वांना मिळेल एसटीचा मोफत प्रवास, हि आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

Admin

Yojana | 700 कोटींच्या गुंतवणूकीतून द्राक्ष-डाळिंबासाठी राबवण्यात येणार ‘ही’ योजना, जाणून घ्या काय होणार फायदा

Admin

कृषी क्षेत्रासाठी महाराष्ट्र जल जलाशय

Admin

Leave a Comment