January 18, 2025
Uncategorized

शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता 50 लाख रुपयापर्यंत अनुदान

 

National Livestock Mission 2021-2022

पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता आणि कौशल्य विकासावर आधारित ‘राष्ट्रीय पशुधन अभियान’ योजना!

 केंद्र शासनाने सन 2021-22 या  वर्षापासून पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता आणि कौशल्य विकासावर आधारीत नविन सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजूरी प्रदान केलेली आहे. सदर योजने अंतर्गत शेळी-मेंढी पालन, वराह पालन, पशुखाद्य आणि वैरण विकास या उपअभियानातंर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती, तसेच वैरण बियाणे उत्पादन अशा योजनाकरिता 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

अनुदानाची अधिकतम मर्यादा :

  • शेळी-मेंढी पालनाकरिता अधिकतम रु. 50 लक्ष, 
  • कुक्कुट पालनाकरिता अधिकतम रु. 50 लक्ष, 
  • वराह पालनाकरिता अधिकतम रु. 30 लक्ष 
  • पशुखाद्य व वैरण विकास यासाठी अधिकतम रु. 50 लक्ष अशी आहे. 

प्रकल्पाकरिता स्वहिसा व्यतिरिक्त उर्वरित आवश्यक निधी बॅंकेकडून कर्जाद्वारे उपलब्ध करुन घ्यावयाचा पर्याय दिलेला आहे.

सदर योजनेचा लाभ हा

  • व्यक्तीगत व्यावसायीक, 
  • स्वयंसहाय्यता बचत गट, 
  • शेतकरी उत्पादक संस्था, 
  • शेतकरी सहकारी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी, 
  • सहकारी दुध उत्पादक संस्था, 
  • सह जोखिम गट (जेएलजी), 
  • सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्टार्ट अप ग्रूप इत्यादी घेवू शकतात.


    हे पण वाचा: PM Kisan Yojana

सदर योजनांच्या लाभाकरिता ऑनलाईन पदृधतीने अर्ज करावयाचा असून, अर्ज सादर करताना 

  1. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), 
  2. पॅनकार्ड, 
  3. आधार कार्ड, 
  4. रहिवाशी पूरावा (मतदान ओळखपत्र, 
  5. वीज देयकाची प्रत), छायाचित्र, 
  6. अनुभवाचे प्रमाणपत्र,
  7. वार्षिक लेखामेळ,
  8. आयकर रिटर्न, 
  9. प्रशिक्षण प्रमाणपत्र, 
  10. जमिनीचे कागदपत्र, 
  11. बॅंकेचा रद्द केलेला धनादेश इत्यादी सादर करणे (अपलोड) अनिवार्य असून,   
  12. जीएसटी नोंदणी इत्यादी उपलब्ध असल्यास सादर करावे.

सदर योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना, वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न, अर्जाचा नमूना इत्यादी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळ https://ahd.maharashtra.gov.in व केंद्र शासनाच्या संकेतस्थळ https://www.nlm.udyamimitra.in यावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. 

तसेच या योजनांची अतिरिक्त माहिती, अर्जाचा नमुना व वारंवार विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाचा(FAQ) तपशिल देखील या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. 

अर्ज सादर करताना सविस्तर प्रकल्प अहवाल DPR ,  पॅन कार्ड,  आधार कार्ड,  रहिवाशी पुरावा,  छायाचित्र, बँकेचा रद्द केलेला चेक इत्यादि ऑनलाईन अपलोड करणे अनिवार्य आहे. तसेच अनुभवाचे प्रमाणपत्र, वार्षिक लेखामेळ, आयकर रिटर्न, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास सादर करावे लागणार आहे. 

Related posts

रेशन कार्ड धारकांना मोठा झटका बसणार आहे. सरकारने नवे नियम (Ration Card Rule) जारी केले आहेत.

Admin

गुढपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर फक्त ‘एकाच रुपयात’ घरी न्या ट्रॅक्टर; शेतकऱ्यांनो जाणून घ्या भन्नाट योजना

Admin

MSRTC Free Travelling Scheme : हे कार्ड असेल तर सर्वांना मिळेल एसटीचा मोफत प्रवास, हि आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

Admin

Leave a Comment