January 8, 2025
Uncategorized

Land Map Satbara | जमीन तुझी का माझी? एका झटक्यात लागणार निकाल, थेट सातबारा उताऱ्यावर ‘असा’ येणार जमीन मोजणी नकाशा

 Land Map Satbara | सध्याच्या आधुनिक युगात सर्व काही डिजिटल झालं आहे. मनुष्य सर्व काही इंटरनेटच्या माध्यमातून सोपं करून पाहत आहे. कोणतीही माहिती एका चुटकीसरशी मिळणं सोपं झालं आहे. पूर्वी यासाठीच लोकांना प्रचंड खस्ता खाव्या लागत होत्या. ज्या आता एका क्लिकवर होत आहेत. अगदी महत्त्वपूर्ण कागदपत्रांसह शेतीशी ही कागदपत्रे (Land Map Satbara) आता ऑनलाईन स्वरूपात मिळण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही कार्यालयाच्या दहा खेट्या कराव्या लागत नाही. शेतकऱ्यांना आता डिजिटल सातबारा (Land Map Satbara) उपलब्ध करून देण्यात आला आहे.

डिजिटल सातबारा | (Digital sign satbara)
जमिनीचा महत्त्वपूर्ण पुरावा म्हणजे सातबारा देखील ऑनलाइन स्वरूपात शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे. या सातबारावर डिजिटल स्वाक्षरी (digital sign satbara)असते. या डिजिटल स्वाक्षरीमुळे सातबारा बनावट आहे की खरा हे समजते. आता शासनाने डिजिटल सातबाराच्या यशानंतर आणखी एक पाऊल उचलला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

डिजिटल नकाशे

जमिनीची मोजणी करताना जमिनीचे नकाशे (bhunaksha)फार महत्त्वाची कामगिरी करतात. आता ऑफलाइन पद्धतीने जमिनीचे नकाशे काढण्यात बराच वेळ जातो. तसेच फसवणूक होण्याची शक्यता देखील असते. शासन डिजिटल सातबारा नंतर आता डिजिटल सातबाऱ्यावर डिजिटल नकाशे उपलब्ध करण्याच्या तयारीत आहे. या बाबतच्या हालचाली ही सुरू झाले आहेत.

जमिनीचा निकाल लागणार झटक्यात

सातबारावर जमिनीचे नकाशे (bhunaksha) उपलब्ध होणार असल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक कळणार आहे. शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन किती व कोणती? हे एका झटक्यात ऑनलाइन माध्यमातून समजणार आहे. त्यामुळे जमिनीबाबत असणारे वादही मिळणार आहेत. कदाचित सातबाऱ्यावर एक क्यूआर कोड देण्यात येईल याद्वारे शेतकरी आपल्या जमिनीचे नकाशे पाहू शकतात. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा वेळही वाचणार आहे.

संबंधित लेख

Related posts

महाराष्ट्रात 5575 आशा सेविका पदाची भरती. 31/03/2023

Admin

रेशन कार्ड धारकांना मोठा झटका बसणार आहे. सरकारने नवे नियम (Ration Card Rule) जारी केले आहेत.

Admin

राज्यात एक शेतकरी एक डीपी योजना राबविण्यास मंजुरी, जाणून घ्या कोणाला मिळेल लाभ?

Admin

Leave a Comment