March 14, 2025
Uncategorized

Yojana | 700 कोटींच्या गुंतवणूकीतून द्राक्ष-डाळिंबासाठी राबवण्यात येणार ‘ही’ योजना, जाणून घ्या काय होणार फायदा

 

आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. देशातील कित्येक नागरिकांचा उदरनिर्वाह शेती (Agriculture) व्यवसायावर चालतो.

Yojana | याच शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून त्याचबरोबर शेतीतील उत्पादन (Agricultural production) अधिक निघावे यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या (Central and State Governments) माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. सध्या फळ शेतीची लागवड (Fruit farming Cultivation) देखील मोठ्या प्रमाणात केली जात आहे. फळशेतीला चालना चालना मिळावी आणि फळशेतीचा विस्तार व्हावा यासाठी सरकार विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करत आहे. आता द्राक्ष आणि डाळिंब उत्पादकांसाठी (Grape and pomegranate growers) एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

द्राक्ष डाळिंब समूह विकास योजना
आता द्राक्ष आणि डाळिंब उत्पादकांसाठी थेट केंद्रीय कृषी मंत्रालयानेच पुढाकार घेतला आहे. आता केंद्रीय कृषी मंत्रालयामार्फत तब्बल 700 कोटींची गुंतवणूक करून नाशिकमध्ये द्राक्ष आणि डाळिंबासाठी समूह विकास योजना अमलात आणली जाणार आहे. या समूह विकास योजनेमुळे आता व्यवस्थापन ते निर्याती पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी देण्यात येणार आहे. यासाठी विविध संस्थांकडून प्रकल्प आराखड्यासह 19 जून 2022 या कालावधीपर्यंत प्रस्ताव दाखल केले जातील. नाशिकमध्ये होणाऱ्या द्राक्षाच्या मेगा क्लस्टरसाठी 405 कोटी 65 लाख तर सोलापूरमध्ये 278 कोटी 72 लाख रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.

निवड
द्राक्ष आणि डाळिंबसाठी समूह विकास योजनेसाठी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून योजनेला आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेवर हे मंडळ नियंत्रण देखील ठेवणार आहे. खरंतर महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाला या योजनेसाठी समूह विकास संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर डाळिंबाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर विकास समितीची स्थापना केली आहे.

काय आहे या योजनेचा मुख्य उद्देश?
• जागतिक बाजारपेठेत भारतीय फळे आणि भाजीपाल्याचा वाटा वाढावा.
• जागतिक स्पर्धेत शेतकरी व निर्यातदारांना संधी मिळावी.
• डाळिंब आणि द्राक्ष उत्पादकांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे.
• द्राक्ष व डाळिंब उत्पादकांना इकडे तिकडे न जाता एकाच छताखाली याबाबत संपूर्ण माहिती मिळावी.

Related posts

कुक्कुटपालन व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती

Admin

MSRTC Free Travelling Scheme : हे कार्ड असेल तर सर्वांना मिळेल एसटीचा मोफत प्रवास, हि आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

Admin

कर्ज खात्याला आधार लिंक कसे करायचे

Admin

Leave a Comment