November 22, 2024
Uncategorized

ई-श्रम कार्ड योजनेसाठी 28 कोटी कामगारांची नोंदणी, तब्बल ‘इतक्या’ लाखांचा फायदा

 

सरकार नागरिकांना विविध योजनांमार्फत मदतीचा हात देत असत.

नागरिकांना कोणत्या ना कोणत्या योजनेतून आर्थिक (Financial) साहाय्य मिळाल्यास त्यांना त्याचा फायदा होईल हाच हेतू सरकार (Government Yojana) ठेवून विविध योजना राबवत. यास योजनांपैकी ई-श्रम कार्ड (E- Shram Card) ही आहे. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. याचा सर्वाधिक परिणाम असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर झाला आहे. लोकांना मजबुरीने घरी जावे लागले. अशा परिस्थितीत या लोकांना मदत करण्यासाठी सरकारने 2020 मध्ये ई-श्रम कार्ड योजना (Yojana) सुरू केली. या योजनेद्वारे सरकार रस्त्यावर मजुरांना 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देते.

आतापर्यंत 28 कोटी कामगारांची नोंदणी
ई श्रम कार्ड (E Shram Card Registration) योजना सुरू झाल्यानंतर आतापर्यंत देशातील तब्बल 28 कोटी कामगारांनी नोंदणी केली आहे. ज्यात बांधकाम कामगार, स्थलांतरित मजूर, शेती कामगार, घरगुती कामगार, कुली, रक्षक, नाई, मोची, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, रिक्षाचालक, ब्युटी पार्लर कामगार, सफाई कामगार इत्यादींचा कामगार लोकांचा समावेश आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी तुमचे वय 16 ते 59 वर्षांच्या दरम्यान असावे.

ई-श्रम कार्डसाठी नोंदणी कशी करावी?
या योजनेत सामील होण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड म्हणजेच आधार क्रमांक आवश्यक आहे. याशिवाय आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर, बचत बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड आवश्यक आहे. ज्या माध्यमाद्वारे सरकार तुमच्या खात्यात थेट आर्थिक लाभ देते. जर कोणत्याही कामगाराकडे त्याचा/तिचा आधार लिंक मोबाईल नंबर नसेल, तर तो/ती त्याच्या जवळच्या CSC/SSK च्या बायोमेट्रिक पडताळणीद्वारे नोंदणी करू शकतो. ई-श्रमिक कार्डसाठी अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. तुम्ही ऑनलाइन अर्जही (Online Registration) करू शकता. यासाठी तुम्हाला श्रमिक पोर्टलच्या eshram.gov.in या वेबसाइटवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल.

ई-श्रम कार्डचे काय आहेत फायदे?

  • दर महिन्याला आर्थिक लाभ थेट कार्डधारकाच्या बँक खात्यात पोहोचतो.
  • रु. 2 लाख विमा संरक्षणासह घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळते.
  • यासोबतच कामगार मंत्रालयाच्या इतर योजनांचा लाभही मिळतो.
  • कामगाराला सरकारकडून 2 लाख रुपयांची विमा सुविधा मिळते.
  • एखाद्या अर्जदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांचा लाभ मिळतो. त्याचबरोबर ई-श्रम कार्डधारकाचे अपघातात अपंगत्व आल्यास त्याला एक लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते.

Related posts

(EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2859 जागांसाठी मेगा भरती

Admin

शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता 50 लाख रुपयापर्यंत अनुदान

Admin

कोकम सरबताचे फायदे आणि रेसिपी

Admin

Leave a Comment