November 18, 2024
Uncategorized

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना |

 

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही  योजना २००५-०६ पासून कार्यन्वयित करण्यात आलेली आहे. यापूर्वी ही योजना “शेतकरी जनता अपघात विमा योजना” या नावाने राबवली जात होती.

शेती व्यवसाय करताना होणाऱ्या अपघातामुळे बऱ्याचदा शेतकऱ्याचा मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व येते. अशा कालावधीत शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. त्यासाठी ही योजना राबवली गेली होती , जेणेकरून अशा गरीब शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात शासनाकडून दिला जाईल. हेच या योजनेचे मुख्य उद्दिष्टय आहे.

शेती करताना शेतकऱ्याला अपघाती मृत्यू येतो त्याची वेगवेगळी कारणे असू शकतात . उदाहरणार्थ अंगावर वीज पडून मृत्यू येणे, नैसर्गिक आपत्ती , पूर, सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात, विजेचा शॉक लागून मृत्यू अश्या वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू ओढवला जाऊ शकतो आणि शेतकरी कुटुंबाचा आधार जातो. 

२००९-१० मध्ये या योजनेसाठी १ लाख एवढी विमा रक्कम संरक्षित केली गेली होती परंतु ह्या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्ष्यात घेता २०१५-१६ मध्ये हि रक्कम वाढवून २ लाख एवढी करण्यात आली आणि योजनेला  ‘गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात योजना’  असे नाव देण्यात आले.

राज्यातील एकूण सर्व सातबाराधारक शेतकऱ्यांचा विमा हफ्ता शासनामार्फत भरण्यात आला असून प्रत्येकी दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. विम्याचा लाभ हा 10 ते 75 वयोगटातील शेतकऱ्याना मिळणार आहे. यापुर्वी ज्या शेतकऱ्याचा अपघात झाला आहे त्या शेतकऱ्याचा सातबारा असणे आवश्यक होते. मात्र, आता यामध्ये बदल करुन जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे शेतजमिन असली तरी सहभागी होता येणार आहे.

हे पण वाचा: Rooftop Solar Yojana

1. महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 या वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य (उदाहरणार्थ आई,वडिल, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकुण दोन व्यक्ति पात्र असतील .      

2. नुकसान भर्पाइची रक्कम-              

अ.-अपघाती मृत्यू- रु.2 लाख.

ब.अपघातामुळे दोन डोळे किंवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.2 लाख                                    क- अपघातामुळे 1 डोळा किंवा 1 हात अथवा एक पाय निकामी झाल्यास – रु.1 लाख.                                             

3. विमा हप्ता देखील भरावा लागत नाही- सर्व शेतकरी यांची विमा हप्त्याची रक्कम (प्रती शेतकरी रु.32.23 रु)  शासनामार्फत विमा कंपनीस भरण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतः विमा हप्ता भरण्याची गरज नाही.    

4. विमा पॉलिसी कालावधी- 10.12.2021 ते 9.12.2022

आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे :

१)७/१२
२)६क
३)६ड(फेरफार)
४)एफ. आय. आर.
५)पंचनामा
६)पोष्ट मार्टेम रिपोर्ट
७)व्हिसेरा रिपोर्ट
८)दोषारोप
१०)दावा अर्ज
११)वारसदाराचे राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तक
१२)घोषणा पत्र अ व घोषणा पत्र ब (अर्जदाराच्या फोटोसह) १३)वयाचा दाखला
१४)तालुका कृषि अधिकार पत्र
१५)अकस्मात मृत्यूची खबर
१६)घटनास्थळ पंचनामा
१७)इंनक्वेस्ट पंचनामा
१८)वाहन चालविण्याचा वैध परवाना
१९)अपंगत्वाचा दाखला व फोटो
२०)औषधोपचारा चेकागदपत्र
२१)अपघात नोंदणी ४५ दिवसाचे आत करणे

अर्ज कुठे करावातालुका कृषी अधिकारी कार्यालय. नमूना अरजसाठी येथे क्लिक करा अर्जाचा नमुना

विमा दाव्याच्या अनुषंगाने पुर्व सुचना अर्ज विहित कागद पत्रांसह ज्या तारखेस तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाखल/प्राप्त होइल व संगणक प्रणालीमध्ये अपलोड होइल त्या दिनांकास तो विमा कंपनीस प्राप्त झाला आहे असे ग्राह्य धरले जाईल.

विमा प्रस्ताव हा सदर विहित कागदपत्रांसह योजनेच्या अंतर्गत विमा संरक्षित कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातांसाठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्या नंतर 90 दिवसां पर्यंत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारणे विमा कंपनीला बंधनकारक राहील.शिवाय योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्या नंतर 90 दिवसां पर्यंत संगणक प्रणाली मध्ये नोंद झालेल्या पुर्व सुचना अर्जानुसार तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे प्राप्त होणारे विमा प्रस्तावसुद्धा विमा पॉलिसी चा कालावधी संपल्याच्या  दिवसापासून 365 दिवसां पर्यंत स्विकारणे विमा कंपनीला बंधनकारक राहील. मात्र सदर कालावधी नंतर कसलाही प्रस्ताव स्विकारला जाणार नाही. तसेच या संदर्भात ग्राहक मंच किंवा इतर निर्णय/आदेश शासनावर बंधनकारक राहणार नाहीत असे या Policy च्या धोरणांमद्धे नमूद केले गेले आहे.

Related posts

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना महाराष्ट्र : Registration Form PDF संपूर्ण माहिती

Admin

कुक्कुटपालन व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती

Admin

रेशन कार्ड धारकांना मोठा झटका बसणार आहे. सरकारने नवे नियम (Ration Card Rule) जारी केले आहेत.

Admin

Leave a Comment