By Editorial team / 6 August , 2022
What is SIP Investment in Marathi
जर तुम्हाला पैश्यानी पैसा कमवायचा असेल तर शेअर मार्केट मध्ये किवा म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक फार चांगला मार्ग आहे. बँकेच्या FD आणि पी.पी.फ Scheme पेक्षा हि जास्त रिटर्न तुम्हाला या मध्ये मिळू शकते. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला स्वतःचा वेळ लावून शेअर मार्केट चे चढ आणि उत्तराचे विश्लेषण कराव लागणार आहे. पण म्यूचुअल फंड मध्ये तशे नाही आपल्याला फक्त investment गुरु कडून फंड निवडायचा आहे आणि बाकी सर्व आपोआप होते.
आपल्या जागी मार्केटची चागली ओळख असले ले लोग आपल्या साठी शेअर मार्केट मध्ये पैसे लावतात आणि आपल्याला चांगला रिटर्न मिळवून देतात. म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे दोन मार्ग आहे एक म्हणजे one time
investment आणि दूसरी म्हणजे systematic investment plan. आज आपण SIP बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
सिस्टेमैटिक इन्वेस्टमेंट प्लान म्हणजे काय? जाणुया सविस्तर माहिती – What is SIP in
Marathi
SIP (एस .आय .पी) काय आहे ? – What is
Systematic Investment Plan
सिस्टेमैटिक इन्वेस्टमेंट प्लान हा एक म्युच्युअल फंड मध्ये गुतंवणूक करण्याचा प्रकार आहे. या प्रकारात निवडलेल्या म्यूचुअल फंड प्लान प्रमाणे एक ठराविक रक्कम काही काळाच्या अंतराने आपल्याला भरावी लागते. एकाच वेळेस मोठी रक्कम न भरता थोडी थोडी रक्कम ठराविक काळाने भरल्यास आपल्याला चांगला नफा मिळू शकतो.
SIP ( एस. आय. पी ) कसा कार्य करतो? – How SIP Works
in Mutual Funds
एकदा तुम्ही एकापेक्षा जास्त SIP (एस. आय. पी ) प्लान साठी आवेदन केले तर निवळल्या प्रमाणे ठराविक रक्कम तुमच्या बँक खात्यातून कापली जाते. शेवटी तुम्हाला काही म्युचुअल फंडचे युनिट एन.ए.वी (NAV (Net Asset
Value)) प्रमाणे वाटप केले जातात.
एस. आय. पी प्लान प्रमाणे प्रत्येक गुंतवणुकीत तुमच्या खात्यात काही युनिट मार्केट वाल्यू प्रमाणे जोडले जातात. प्रत्येक गुंतवणुकीत रक्कम मोठी होत जाते आणि त्यावर मिळणारा नफा सुधा मोठा होत जातो. गुंतवणूकदार आपल्या इच्छे प्रमाणे कधीपण एस. आय. पी प्लान च्या शेवटी किवा ठराविक वेळाने जमा रक्कम आणि जमा झालेला नफा खात्यातून बाहेर काढू शकतो.
चला याला एका उदाहरणाने समजण्याचा प्रयत्न करू.
समजा तुमच्या कडे म्युचुअल फंड मध्ये गुंतवण्यासाठी १ लाख इतकी रक्कम आहे. हि रक्कम तुम्ही पूर्ण एका वेळस पण म्युचुअल फंड मध्ये गुंतवु शकता किवा ठराविक रक्कम एस. आय. पी प्रमाणे महिनेवारी गुंतवु शकता. समजा तुम्ही एस. आय. पी प्लान प्रमाणे ५०० रुपये महिनेवारी गुंतवण्याचे ठरवले. तर प्रत्येक महिन्यात ५०० रुपये तुमच्या बँक खात्यातून कापले जातील आणि तुमच्या म्युचुअल फंड खात्यात जमा होतील. हि प्रक्रिया एस. आय. पी प्लानची कालावधी संपण्या पर्यंत चालू राहणार.
एस. आय. पी मध्ये कधी एन्वेस्ट करावे ? – When to Invest
in SIP
एस. आय.पी चालू करण्यासाठी तुम्हाला वेळेच कोणत बंधन नाही तुम्ही कधीपण एस. आय. पी चालू करू शकता. तुमच्या सोयी प्रमाणे तुम्ही योग्य तो प्लान निवडला पाहिजे तर नकीच तुम्हाला चागला रिटर्न मिळेल.
१) टोप–अप (एस.आय.पी) – Top-up SIP
टोप–अप एस. आय.पी मध्ये तुम्ही तुमची गुंतवणुकीची रक्कम वळवू शकता तुमचा इनकम वेळे सोबत वळला तर तुम्ही तुमची महिनेवारी एस.आय.पी ची रक्कम वळवू शकतात पण एका विशिष्ट कालांतराणे.
२) फ्लेक्झिबल एस. आय.पी – Flexible SIP
फ्लेक्क्षिबल एस.आय.पी मध्ये तुम्ही तुमची महिनेवारी गुंतवणुकीची रक्कम वळू किवा कमी करू शकता म्हणून याला फ्लेक्झिबल एस, आय .पी असे म्हण्तात.
३) परपेचुअल एस.आय.पी – Perpetual SIP
या एस.आय.पी प्लान मध्ये तुम्ही मुदत संपण्या आधी तुमची रक्कम आणि रिटर्न कधी पण बाहेर काढू शकता. तुमच्या गरजे प्रमाणे किवा आर्थिक उद्धिष्ट साधले कि तुम्ही आपली रक्कम खात्यातून काढू शकता इतर एस.आय.पी प्लान मध्ये तुम्ही फक्त मुदत संपल्यावर रक्कम बाहेर काढू शकता.
एस.आय.पी मध्ये गुतंवणूक करण्याचे फायदे – Benefits of SIP
Investment Plan
1. तुम्हाला म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी शेअर मार्केटचे कोणतेही ज्ञान नसले तरी चालेल. तुम्हाला म्युचुअल फंड मध्ये पैसे गुंतवल्यावर मार्केटचे चढ उतारचे विश्लेषण करण्याची गरज नाही. आपोआप तुमच्या खात्यातून रक्कम कापली जाईल व तुमच्या म्युचुअल फंड खात्यात जमा होईल. तुमचा पैसा शेअर मार्केट मधेच लावला जाईल पण तो तज्ञ लोकांकडून लावला जाईल. आणि अशा प्रकारे लावला जाईल कि त्यात रिस्क फार कमी असेल.
2. एस. आय.पी मध्ये तुम्ही मार्केटच्या अस्थिरतेचा फायदा घेऊ शकता. जेव्हा मार्केट वर असेल तेव्हा तुम्ही कमी युनिट विकत घेऊ शकता आणि जेव्हा मार्केट खाली असेल तेव्हा तुम्ही जास्त युनिट विकत घेऊ शकता.
3. म्युचुअल फंड हे बँक (एफ. डी ) , Public
Provident Fund (PPF) Account पेक्षा जास्त रिटर्न देतात.
सिस्टेमैटिक इन्वेस्टमेंट प्लान बद्दल विचारल्या जाणारे काही महत्वाचे प्रश्न – SIP Investment
Plan Questions and Answers
Q. म्युचुअल फंड मध्ये तुम्ही कमित कमी किती पैसेची एस.आय.पी करू शकता?
उत्तर : म्युचुअल फंड मध्ये तुम्ही कमीत कमी १०० रु प्रती महिना गुंतवू शकता.
Q. एस. आय. पीचे किती प्रकार आहे आणि कोणते?
उत्तर: एस. आय. पी चे एकूण सात प्रकार आहे ते खाली दिलेले आहेत.
- रेगुलर एस.आय.पी
- टोप उप एस.आय.पी
- फ्लेक्झिबल एस.आय.पी
- प्रेपेतुअल एस.आय.पी
- टरीगर एस.आय.पी
- एस.आय.पी आणि इन्शुरन्स
- मलटी एस.आय. पी
Q. एस. आय. पी करण्याची योग्य वेळ कोणती आहे?
उत्तर: तुम्ही एस. आय.पी मध्ये कधी पण पैसे गुंतावू शकता त्याला वेळेच काही बंधन नाही.
Q. फ्लेक्झिबल एस. आय. पीचे फायदे काय आहे?
उत्तर: फ्लेक्झिबल एस.आय.पी मध्ये तुम्ही तुमची महिनेवारी एस.आय.पी ची रक्कम तुमच्या गरजे प्रमाणे कमी किवा जास्त करू शकता.
Q. म्युचुअल फंड आणि शेअर मार्केट यामध्ये पैसे गुंतवण्यात काय फरक आहे?
उत्तर: शेअर मार्केट मध्ये तुम्ही जेव्हा पैसे गुंतवता तेव्हा तुम्हाला स्वतःला मार्केटचे चढ आणि उताराचे विश्लेषण करावे लागते पण म्युचुअल फंड मध्ये तुम्ही स्वतः मार्केटचे विश्लेषण करत नाही तर मार्केटचे तज्ञ विश्लेषण करतात आणि तुम्हाला चांगले रिटर्न मिळवून देतात.